दहिवडी (सातारा) : खासदार शरद पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा, संस्कृतीवरचा हल्ला आहे. सरकारने या हल्ल्यामागील सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली. काल खासदार शरद पवार यांच्या घरावर एस. टी. महामंडळाच्या आंदोलनातील काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी येथे महाविकास आघाडीने बाजार पटांगण ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. (व्हिडिओ : रुपेश कदम)
#satara, #dahivadi, #sharadpawar, #maharashtra, #prabhakardeshmukh, #ncp, #stemployeeprotest, #stemployee,