हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘लॉकअप’ शोमुळे चर्चेत आहे. कंगनाचा हा शो ओटीटीवर येत आहे. 27 फेब्रुवारीपासून याची सुरुवात झाली असून अल्पावधीतच याने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे.
‘लॉकअप’मध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे स्पर्धक म्हणून आले आहेत. एकता कपूरच्या या शोमध्ये कंगना रणौत होस्टच्या भूमिकेत आहे. अनेकदा सेलेब्सही या शोमध्ये पाहुणे म्हणून येत असतात. नुकतीच टीव्ही आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे या शोमध्ये पोहोचली.