सध्या प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला, हे पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. चित्रपटात अफजल खानची भूमिका बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मुकेश ऋषी यांनी साकारली आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्यात त्यांनी ही भूमिका साकारतानाचे अनुभव सांगितले.