नाशिक : तीन स्मशानभूमी; पण प्रत्येकला तार कंपाऊंड... अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी गेलेल्या नातलगांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच चिता रचून मृतदेहाला अग्निडाग दिला. शनिवारी (ता. १६) ही घटना घडली चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे. ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला असून, तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
#NashikNews #Nashik #BreakingNewsToday #BigNews #MarathiNews