होम मिनिस्टर हा झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम गेली १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आला आहे आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. नुकतंच होम मिनिस्टरचं नवीन पर्व महामिनिस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस असून या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु असताना अनेक ट्रोलर्सने त्याबद्दल ट्रोलिंग सुद्धा सुरु केलं.