नौदलाच्या आयएनएस दिल्ली या युद्धनौकेवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. दिल्ली युद्धनौका १९९७ ला नौदलात दाखल झाली होती आणि त्यांनतर काही वर्षांनी नौदलासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले होते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राला सामावून घेण्यासाठी दिल्ली युद्धनौकेत काही सुधारणा करण्यात आल्या. यायबाबतची चाचणी घेण्यात आल्याचे नौदलाने संबंधित व्हिडीओ प्रसिद्ध करत जाहीर केले आहे.
#CombatReady #Credible
#FutureProofForce #delhi