तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. या मालिकेतील एक व्यक्तिरेखा जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे अनामिकाची मुलगी राधा. राधाची व्यक्तिरेखा कवी संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे साकारतेय. रुमानीची हि पहिलीच मालिका.