अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून भेटत आलोय. तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं. तुझेत मी गीत गात आहे या मालिकेत ती मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.