गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. गडचिरोली पोलिसांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी गावाच्या परिसरातील आरोग्य सेविका, आदिवासी बांधव, बालकांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.
#AjitPawar #Gadchiroli #DilipWalsePatil #Sakal #NCP #UddhavThackeray #Naxalites #AjitPawarNews #Maharashtra