काही महिन्यांपूर्वी बिग बजेट फिल्म 'तमाशा लाईव्ह'चे पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधील सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त लूक बघून अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, हा नक्की कशावर आधारित चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील एक एक गोष्टी आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या असून 'तमाशा लाईव्ह'मधील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.