'शून्य सावली दिवस' ही भौगोलिक घटना लहान-थोरांना अत्यंत कुतूहल निर्माण करणारी आहे. खेळ सावल्यांचा सर्वांनाच आनंददायी वाटतो. परंतु आपल्या आजूबाजूला खेळणारी सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडून जाते. हे कुतूहल अनुभवण्यासाठी सोमवारी सुभेदारवाडा कट्ट्याने एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गजानन विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
#ZeroShadowDay