"आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. मीडियामधील फूटजे आमच्या वकिलांनी कोर्टात दाखवलं. त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी हे सगळं केलं. आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला," असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. "महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन," असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच ठाकरे सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला. संदीप देशपांडे 16 दिवसांनी मुंबईत परत आले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले