Mahadev Jankar | आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार : महादेव जानकर | Sakal Media

Sakal 2022-05-29

Views 3

Mahadev Jankar | आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार : महादेव जानकर | Sakal Media

केंद्राच्या माध्यमातून सिमेंट रस्ते, जिहे-कठापूर योजनेअंतर्गत उत्तर भागातील गावांना पाणी, म्हसवडमधील केंद्रीय एमआयडीसी इत्यादी माण तालुक्यातील सर्वांगीण विकास कामं मीच पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतली. मात्र, म्हसवड एमआयडीसीबाबत (Mhaswad MIDC) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोडा घातल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलाय. माजी मंत्री जानकर सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार आहे, असा दावा करत जानकर पुढं म्हणाले, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह म्हसवड पालिकांच्या निवडणुका रासप (Rashtriya Samaj Paksha) स्वबळावर लढविणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (व्हिडिओ : सल्लाउद्दिन चोपदार)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS