औरंगाबादचे एमआयएमचे खाजदार इम्तियाज जलील यांची चंद्रकांत खैरे यांची नक्कल उडवलीये. जालन्यात इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रात्री उशीरा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. यावेळी कोणत्याही पुतळ्याला माझा विरोध असून एकेक कोटी रुपये फक्त पुतळ्यांवर खर्च करतात. यावेळी आमच्या जिल्ह्यातला एक नेता म्हणतो तु कशाला विरोध करतो. असं म्हणत चंद्रकांत खैरंची नक्कल उडवली. त्याचबरोबर पुतळा बनवायचा असेल तर मी पाच लाख देतो तुम्ही किती देणार असं म्हणत खैरेंची टिंगल उडवली.
#ImtiyazZaleel #ChandrakantKhaire #Aurangabad #Sambhajinagar #MIM #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray #HWNews