राज्यसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे. त्यांना या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे, असं दिसत आहे खरं तर त्यांच्याकडे एवढी मते नाही आहेत, जर मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केले असते. पण भाजपाने आधी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
#Kolhapur #SanjayRaut #DhananjayMahadik #Rajyasabha #SambhajiRaje #SupriyaSule #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #RohitPawar #RahulGandhi #HWNews