पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. चौंडीत सभेचं आयोजन करण्यात आलं असून रोहित पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतर शरद पवारदेखील या कार्यक्रमाला हजर होते. शरद पवार तब्बल नऊ वर्षांनंतर म्हणजे ८ सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच जयंती सोहळ्यास चौंडीत आले आहेत. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी अहिल्यादेवींचं काम हे सर्वसमावेशक प्रकारचं होतं. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारं होतं असं सांगितलं.
#SharadPawar #RohitPawar #AhilyabaiHolkarJayanti #UddhavThackeray #AjitPawar #NCP #Pune #Chondi #Ahmednagar #HWNews