शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपच्या गोटातून दीपाली यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. दीपाली सय्यद यांच्या विरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, त्या नंतर भाजप युवा मोरचाच्या सरचिटणीस उमा खापरे यांनी दीपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी उमा खापरे यांच्या विरोधात आज ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
#DeepaliSayyed #UmaKhapre #BJPShivsena #OshiwaraPoliceStation #DevendraFadnavis #UddhavThackeray #HWNews #DipaliSayyed