कश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट होईल, असं सांगणारं केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे, जवानांचे आणि अनेक मुस्लीम पोलीस अधिकाऱ्यांचं रक्षण करु शकत नाही. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ निवडणुका आणि राजकारणात गुंतले आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसंच फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर यांच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, असंही राऊत म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
#SanjayRaut #RaosahebDanve #KashmiriPandit #CentralGovernment #HardikPatel #ED #CBI #MohitKamboj #Shivsena #BJP #MVA #hwnews