जेलमध्ये असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतील का याची चर्चा आहे. त्यांना मतदानाची परवानगी मिळावी म्हणून राष्ट्रवादी न्यायालयात जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक सध्या वेगवेगळ्या आरोपांखाली कोठडीत आहेत.