भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही माघार न घेतल्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत. पहिले पाच उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय होणार आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी होणारी लढत चुरशीची होणार आहे. अशातच आता भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी मोठा दावा केला असून ही निवडणूक भाजपच जिंकेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
#DhananjayMahadik #BJP #RajyaSabha #MahaVikasAghadi #Kolhapur #ChandrakantPatil #DevendraFadnavis #ShivSena #Congress #NCP ##Maharashtra #hwnews