सध्या वरुणराजाचं आगमन राज्यात लांबलंय आणि त्यातच तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची लाही होतेय. माणसांसोबतच प्राण्यांनाही उकाडा हैराण करतोय. चंद्रपूरमध्ये अशाच उष्णतेने तहानलेल्या माकडाचं डोकं तांब्यात अडकलं आणि त्याच्या सुटकेसाठी अन्य माकडांनी गोंगाट सुरु केला. डोकं अडकलेलं ते माकड छोटं पिल्लू असल्याने अन्य माकडं त्याच्या सुटकेसाठी जास्त कासावीस झाली. या सगळ्यामध्ये वनविभागाला या पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी ७ तास लागले.