केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर रविवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणात नवीन माहिती समोर आलीय. भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करणारे
कराडांचेच कार्यकर्ते होते का? कराडांच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाकडून दुसऱ्या गटाला मारहाण करण्यात आली का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण कराडांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्यांचे कराड यांच्यासोबत फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होतायेत. त्यामुळं पंकजा मुंडेंभोवती ट्रॅप रचण्याचा कुणाचा प्रयत्न आहे का? असा सवाल पंकजा समर्थकांकडून उपस्थित होतेय.