भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात अभिनेते पुष्कर श्रोत्रींनी विखे पाटलांची नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर विखे पाटलांनी अजितदादांना आमच्यासोबत या अशी साद घातली. विखे पाटलांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात लगेचच त्याची चर्चाही रंगली. पण अजितदादा खरंच विखेंच्या हाकेला प्रतिसाद देणार का?