राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरु केलाय. पण शरद पवार यांनी उमेदवार होण्यास नकार देऊन या प्रयत्नांना सुरुवातीलाच धक्का दिला. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार होण्यास शरद पवार यांनी का नकार दिला याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरु झालीय.आता तिन्ही नेते चर्चा करुन निर्णय घेणार.