Moonsoon Update : राज्यभरातल्या जनतेला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी मान्सूननं महाराष्ट्र व्यापलाय. हवामान विभागानं तसं जाहीर केलंय. राज्यात पुढचे २-३ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला. तिथं पुढचे पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. तर राज्यभरात पुढचे 2-3 दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.