पावसानं दडी मारल्यानं मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईत ३० ते ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्यानं मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ११ टक्केे पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांत पाऊस झाला नाही तर मुंबईकरांवर पाणी संकट ओढवू शकतं.