आजच्या राजकीय परिस्थितीवरून ठाकरेनिष्ठ विरुद्ध पवारनिष्ठ असा लढा राज्यात सुरु आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण शिवसेनेचे निष्ठावंत, दिवंगत नेते आनंद दिघेंचे शिष्य एकनाथ शिंदेंनी तब्बल दोन तृतीयांश आमदार सोबत घेऊन बंड पुकारलंय. शिवसेनेच्या ५६ वर्षातलं हे सर्वात मोठं बंड मानलं जातंय. शिंदेच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळतोय. याचा परिणाम म्हणजे राज्यात सत्तापालट होणार का असा सवालही उपस्थित होतोय. दरम्यान त्याआधी निकालापासून आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम थोडा उलगडून पाहू