आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेल्याचा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सूरतहून सुटकेची कहाणी ऐकवली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत होते. संपूर्ण शिवसेनेत बंड करुन अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु कैलास पाटील सूरतहून आणि नितीन देशमुख गुवाहाटीवरुन परतले.
#NitinDeshmukh #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #SanjayRaut #HWNews