ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या ३७ आमदारांनी राज्यपाल आणि उपसभापतींना पत्र लिहून एकनाथ शिंदे यांचे नाव विधीमंडळ पक्षनेते म्हणून नाव दिले.एकनाथ शिंदे यांना आता 37 आमदारांचा पाठिंबा आहे, पक्षांतरविरोधी कायद्याचा भंग न करता विधानसभेत युती तोडण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.