राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या पत्रात २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. राज्यपालांच्या पत्राचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात, येत्या 24 तासात ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करावे असे राज्यपालांनी म्हटले आहे.