राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार असा मागील काळातला इतिहास पाहता या आदेशानं कुणालाच नवल वाटलेलं नाही. कारण काल फडणवीस दिल्लीहून थेट राजभवनात पोहचले. तिथे त्यांनी दिलेल्या पत्राच्या आधारेच आज सकाळी राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेत. आणि याच आदेशाविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांवी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यावर आज संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता बहुमत चाचणी म्हणजे काय? राज्यपालांनी काय आदेश दिला आणि तो कायदेशीररित्या योग्य की अयोग्य? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेणार आहोत.