बुधवारी सायंकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. मात्र औरंगाबाद शहराच्या नामकरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.