राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन केल्यावर बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यासाठी एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसहित विधानभवनात दाखल झाले आहेत. सर्व आमदारांनी भगवे फेटे घातले आहेत.