1 जुलै 2022 पासून भारतात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी सिंगल यूज प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या लाखो मेट्रिक टन प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी आणि प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.