तळकोकणात उंच कड्यावरून गर्द वनराईत दाट धुक्यातुन वाट काढत १५० फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत कोसळतोय मांगेलीचा धबधबा. १५० फुटांवरून कोसळणारा धबधब्याच्या मुळात जाण्यासाठी डोंगरात ट्रेकिंगचा आनंदही लुटता येतो. धबधब्याच्या मुळाशी न जाताही १५० फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार धबधब्याच्या परिसरात ५०० मीटरच्या परिसरात हे पाण्याच्या तुषारानी आपोआप भिजण्याचा आनंद घेता येतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाच्या सीमेवर असलेला दोडामार्गातील मांगेलीचा धबधब्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला दोडामार्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळते.