नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे आणि यामुळे प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा देखिल खळाळून वाहत असून हे नयनरम्य दृश्य बघत विकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही ईथे मोठ्या संख्येने दाखल होतायत. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटून देखिल नाशिकमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली नव्हती, शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठाही 26 टक्क्यांवर आला होता