राज्यात काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता.मात्र, यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
#EknathShinde #AjitPawar #HeavyRain #Monsoon #IMD #Maharashtra #AjitPawar #NCP #SharadPawar