बईतील आरे कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेडच्या बांधकामाविरोधात आंदोलन सुरू आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मेट्रो कारशेडच्या बांधकामाच्या निषेधार्थ आतापर्यंत आम आदमी पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस आंदोलनात उतरले आहेत. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे.