Mumbai :कविवर्य शांताराम नांदगावकरांचा १२वा स्मृतीदिन सोहळा शांताराम नांदगावकर फाउंडेशन तर्फे संपन्न

ABP Majha 2022-07-12

Views 1

Mumbai : शब्दांचा राजा, अजातशञू कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा  १२ वा स्मृतीदिन सोहळा शांताराम नांदगावकर फाउंडेशन तर्फे मिरा रोड मध्ये त्यांच्या निवास्थानी संपन्न झाला. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यक्रमास मिरा भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे तसेच आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त रवी पवार तसेच स्थानिक नगरसेविका अशा अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात कवी नांदगावकर यांचा मुलगा प्रशांत आणि सून सुहासनी यांनी डॅडीच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. त्याचबरोबर नांदगावकरांचे नातेवाईक हेमंत निकम आणि मिञ परेश पेवेकर यांनी ही नांदगावकरांची गीते सादर करुन, शब्दपुष्पांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी शांताराम नांदगावकरांना ही आपल्या भावनातून श्रध्दांजली व्यक्त केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS