राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात ९९ जणांचा बळी गेलाय. तर १८१ जनावरं दगावलीत. तर आजवर ८ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे.