"आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही दाखल केलेल्या रिपोर्टवरून न्यायालायाने हा निर्णय दिला आहे. तत्कालिन मविआ सरकारने या आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही, असे मी म्हणणार नाही, त्या सरकारमध्येही अनेक नेते होते, ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने याकडे गांभीर्याने बघितले नाही," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.