पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 7 नवीन जिल्हे निर्माण करत असल्याची घोषणा केली आहे. बंगालमध्ये पूर्वी 23 जिल्हे होते, आता 7 नवीन जिल्ह्यांची घोषणा केल्यानंतर एकूण 30 जिल्हे झाले आहेत. बंगालमध्ये 23 जिल्हे आहेत, त्यांचे क्षेत्रफळ जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यांचे विभाजन करून त्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते.