मनोरंजनाचा डबल डोस घेऊन 'दे धक्का २' चित्रपट आज शुक्रवारी (५ ऑगस्ट) पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने 'दे धक्का २' चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी लंडनमध्ये शूटींगदरम्यान सिद्धार्थ जाधवच्या शॉपिंगवरुन एक रंजक किस्सा घडला होता. त्यावरुन महेश मांजरेकर हे सिद्धार्थवर संतापले होते.
#dedhakka2 #MaheshManjrekar #shooting #london