एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. यात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. शिवाय भाजपनं आरोप केलेल्या आमदारांनाच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय, याविषयी देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.