नारळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त, हा सण गोवा, गुजरातच्या किनारी भागातही साजरा केला जातो, जेथे कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुण देवाची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात, समुद्रात होणार्या अनुचित घटनेपासून वाचव अशी प्रार्थना करतात.