एखाद्या सिनेमात घडतं अगदी त्याप्रमाणे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये छापा टाकला. छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणालाही लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते. 'दुल्हन हम ले जायेंगे' असे स्टिकर असलेल्या लग्नाच्या गाड्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात पोहोचले आणि आठ दिवस छापे मारून 390 कोटी बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला.
#IncomeTax #ITRaid #Jalna #DulhanHumLeJayenge #IncomeTaxDepartment #Crime #IncomeTax #Maharashtra #Tax #HWNews