एकनाथ शिंदे यांच्या बंडाला दोन महिने पूर्ण होऊनही शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? या दोन प्रश्नांची उत्तरं काही मिळालेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी विविध याचिका दाखल केल्या आहेत. मुंबई महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीअगोदर चिन्हाचा प्रश्न निकाली लागावा, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. यानंतर न्यायालयाच्या दारी फैसला होण्याअगोदर निवडणूक आयोग चिन्हाचा निकाल लावेल, अशी भीती मनात असल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #Symbol #SupremeCourt #ThackerayVsShinde #ElectionCommission #Maharashtra #HWNews