राजकारण, सत्ताकारणाचा खेळ कधी आणि कसा बदलेल हे सांगता येत नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातलं मोठं नाव म्हणजे नितीन गडकरी. विदर्भातलं हे नेतृत्व सध्या केंद्रीय स्तरावर आहे. आणि त्यांच्या खात्यानं केलेल्या रस्तेनिर्मितीच्या कामांमुळे देशभरात त्यांची वाहवाच होत असते. पण आता याच नितीन गडकरींचा अडवाणी होणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.