यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वांनी या उत्सवाचा आनंद घेतला. काही ठिकाणी थर रचताना काही गोविंदा जखमी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, बुलडाण्यातून आता धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली. कार्यक्रमामध्ये झालेल्या या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे.
#ShwetaMahale #BJPYuvaMorcha #Dahihandi2022 #Buldana #Janmashtami #Covid #Chikhali #Fighting #MaharashtraPolitics