राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात बोलताना बिल्कीस बानो प्रकरणी दोषींची सुटका करण्याच्या निर्णयावरून पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला.